LPG Gas Crisis : गॅसटंचाईमुळे शहरात मातीच्या चुलींना पुन्हा वाढली मागणी

By अजित घस्ते | Updated: March 15, 2026 11:36 IST2026-03-15T11:36:02+5:302026-03-15T11:36:34+5:30

- सध्या हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांकडून चुलीला मागणी वाढली आहे.

pune news LPG Gas Crisis Demand for clay stoves has increased again in the city due to gas shortage | LPG Gas Crisis : गॅसटंचाईमुळे शहरात मातीच्या चुलींना पुन्हा वाढली मागणी

LPG Gas Crisis : गॅसटंचाईमुळे शहरात मातीच्या चुलींना पुन्हा वाढली मागणी

पुणे : गॅस टंचाई वाढल्याने आजही कोणतीही यंत्रसामग्री न वापरता पूर्णपणे हाताने तयार केलेल्या मातीच्या चुलींना मागणी वाढली असून, चुलीवरच्या जेवणाची आठवण केली जात आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही पुन्हा मातीच्या चुलींना पसंती दिली जात असून, सध्या हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांकडून चुलीला मागणी वाढली आहे.

पुण्यात कसबा पेठ येथील कुंभारवाडा येथील कारागिरांना उभारी मिळू लागली असून, पारंपरिक पद्धतीने माती व शेणापासून बनविल्या जाणाऱ्या चुलींना मोठी मागणी आहे. घरगुती चूल २५० रुपयांपासून ते ३००, तर हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी चूल ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

गॅस टंचाईमुळे अनेकांना चुलीची गरज भासवत आहे, तर आजही चुलीवरच्या भाकरीची चव आवडत असल्याने घरात गॅस असला तरी काही लोक चुली घेऊन जात आहे, तर चुलीवरचे जेवण खाण्यासाठी खवयी बाहेर जाऊन खाणे पसंत करीत आहे. यामुळे आता लाकूड आणि चूल पुन्हा आठवण येत असून, मागणी वाढली आहे. 

सध्या दोन ठिकाणांहून जाळ निघणारी चूल सुमारे ३०० रुपयांना, तर एकाच ठिकाणाहून जाळ निघणारी सडीची चूल सुमारे २५० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय हॉटेल व्यावसायिक मोठ्या चुली एक हजार रुपयांना आहेत, तर बीड व नाशिक, रामपूर येथून चुली आणल्या जात आहेत. तसेच ग्राहकांकडून चुलीबरोबर वाढत्या उन्हामुळे माटही घेऊन जात आहेत.  - चंद्रकात कुंभार, व्यावसायिक

Web Title : एलपीजी संकट: पुणे में मिट्टी के चूल्हों की मांग फिर बढ़ी

Web Summary : एलपीजी गैस की कमी के कारण पुणे में पारंपरिक मिट्टी के चूल्हों की मांग बढ़ रही है। कसबा पेठ के कुम्हारों को लकड़ी से बने भोजन के स्वाद की तलाश में घरों और रेस्तरां से अधिक ऑर्डर मिल रहे हैं। कीमतें आकार के आधार पर ₹250 से ₹1000 तक हैं।

Web Title : LPG Shortage Sparks Resurgence of Clay Stoves in Pune

Web Summary : Pune sees rising demand for traditional clay stoves due to LPG gas shortages. Potters in Kasba Peth are experiencing increased orders from households and restaurants seeking the taste of wood-fired cooking. Prices range from ₹250 to ₹1000 depending on size.