Pune news : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:37 IST2026-04-10T12:37:33+5:302026-04-10T12:37:33+5:30

- काही दिवसांत भूसंपादनाचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा

Pune news Land acquisition file for Katraj-Kondhwa road sent to Revenue Minister | Pune news : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांकडे

Pune news : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांकडे

पुणे : बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या सक्तीच्या भूसंपादनाची फाईल महसूलमंत्र्यांच्या कार्यालयाकडे आहे. येत्या काही दिवसांत भूसंपादनाला मान्यता मिळेल, असा विश्वास शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

कात्रज-कोंढव्यापासून मंतरवाडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंना लोकवस्ती वाढल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने कात्रज येथील राजस सोसायटी चौक ते कोंढवा खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन कि.मी. लांबीच्य रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु अगोदर निविदांमधील अडचणी आणि नंतर भूसंपादनातील अडचणींमुळे या रस्त्याचे काम अनेक वर्षे रेंगाळले आहे.सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळे रस्त्याचे भूसंपादन वेळेत व्हावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले जात आहेत. या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महापालिका यांनी याविषयी वारंवार बैठक झाल्यानंतर १५ मार्चपर्यंत कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्याने अद्याप भूसंपादनाचा प्रश्न सुटलेला नाही.

याविषयी पावसकर म्हणाले, महसूलमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कात्रज-कोंढव्याच्या भूसंपादनाचा विषय निघाला होता. येत्या काही दिवसातच प्रस्तावाला मान्यता मिळेल, असे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे. सुमारे ३.५ ते ४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या विकासासाठी जवळपास २७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या हरकतींमुळे प्रक्रिया रखडली होती; मात्र आता आवश्यकतेनुसार सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title : पुणे: कात्रज-कोंढवा सड़क भूमि अधिग्रहण फाइल राजस्व मंत्री की मंजूरी का इंतजार

Web Summary : कात्रज-कोंढवा सड़क चौड़ीकरण परियोजना भूमि अधिग्रहण की बाधाओं के कारण विलंबित है। फाइल अब राजस्व मंत्री के पास है, और जल्द ही मंजूरी मिलने की उम्मीद है। इस परियोजना का उद्देश्य व्यस्त मार्ग पर यातायात की भीड़ और दुर्घटनाओं को कम करना है। 3.5-4 किमी सड़क विकास के लिए लगभग 27 हेक्टेयर भूमि की आवश्यकता है।

Web Title : Pune: Katraj-Kondhwa Road Land Acquisition File Awaits Revenue Minister's Approval

Web Summary : The Katraj-Kondhwa road widening project faces delays due to land acquisition hurdles. The file is now with the Revenue Minister, and approval is expected soon. This project aims to reduce traffic congestion and accidents on the busy stretch. Approximately 27 hectares of land is required for the 3.5-4 km road development.