छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:41 IST2025-07-31T09:40:56+5:302025-07-31T09:41:27+5:30

दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून तोडफोड केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

pune news Khutbav, Galandwadi, Kedgaon closed today to protest against the Yavat incident | छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद

केडगाव : दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून तोडफोड केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

खुटबाव, गलांडवाडी, केडगाव दिनांक ३१ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय परिसरातील ग्रामपंचायत यांनी घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत दिनांक ३१ रोजी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आस्थापना बंद ठेवून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणताही व्यवहार होणार नसून ग्रामस्थांनी या बंदला प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन ग्रामपंचायतमार्फत करण्यात आले आहे.

तसेच दि. ३१ रोजी यवत येथील काळभैरवनाथ मंदिरासमोर सायंकाळी चार वाजता संपूर्ण दौंड तालुक्यातील गावे सहभागी होणार आहेत. अशी माहिती अखिल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. देलवडी, एकेरीवाडी, पारगाव, नानगाव, दापोडी, खोपोडी, वाखारी, बोरीपार्धी, केडगाव खुटबाव, गलांडवाडी येथील तरुणांनी विविध माध्यमांच्यामधून तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची कायदेशीर चौकशी होऊन त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांमधून होत आहेत.

 

Web Title: pune news Khutbav, Galandwadi, Kedgaon closed today to protest against the Yavat incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.