शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वसुलीत खडकवासला प्रकल्प राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:53 IST

- ३१ मार्च अखेर ४४६ कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा, पुणे महापालिकेकडून २५१ कोटी जमा 

पुणे : जलसंपदा विभागाला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या पाणीपट्टीच्या वसुलीत पुणे विभागातील खडकवासला कार्यकारी अभियंता कार्यालयाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या एकूण थकबाकीचे उद्दिष्ट ४६२ कोटी रुपये होते. त्यापैकी सुमारे ४४६ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्या खालोखाल ठाणे कार्यकारी अभियंता विभागात ३०० कोटी, तर हिंगोली विभागात १८० कोटींची वसुली केली होती. दरम्यान पुणे महापालिकेकडून २५१ कोटी, तर पिंपरी महापालिकेकडून सुमारे ७७ कोटी रुपयांची वसुली करण्यात केली आहे. 

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. तसेच मार्च अखेर १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट दिल्याने अधिकाऱ्यांनी कंबर कसली होती. खडकवासला प्रकल्पात यंदाची बिगर सिंचनाची पाणीपट्टी एकूण ४५८ कोटी तर सिंचनाची पाणीपट्टी ३ कोटी ५८ लाख रुपये होती. त्यानुसार पुणे महापालिकेकडे असलेल्या ९४८ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने पाणी तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महापालिकेने ३१ मार्च अखेर २०२ कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा केली आहे. या रकमेवर ४९ कोटी रुपयांची रक्कम समायोजित करण्यात आली. त्यानुसार ही पाणीपट्टी २५१ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. 

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ५६ कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. या रकमेवर २० कोटी रुपयांची रक्कम समायोजित करून एकूण वसुली ७६ कोटी ९० लाख रुपयांची झाली आहे. तसेच चिंचवड, हिंजवडी, कुरकुंभ या तीन एमआयडीसी कार्यालयांकडून एकूण ५० कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. एकूण बिगर सिंचनाची ४४१ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे. तर सिंचनाची वसुली ४ कोटी ३ लाख रुपये झाली आहे.

खडकवासला कार्यकारी अभियंता कार्यालयाला ४६१ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४४६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. राज्यातील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे. त्यानंतर ठाण्यात ३०० कोटी तर हिंगोलीत १८० कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली. - किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

English
हिंदी सारांश
Web Title : Khadakwasla Project Tops Maharashtra in Water Tax Recovery

Web Summary : Khadakwasla project leads Maharashtra in water tax recovery, collecting ₹446 crore against a ₹462 crore target. Pune and Pimpri corporations contributed significantly. Water Resources Minister focused on 100% recovery.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र