शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट आरोग्य केंद्राचा फक्त नावापुरता गाजावाजा? मोरगावात पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:43 IST

या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मोरगाव : राज्यातील प्रमुख तीर्थस्थान आणि अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्मार्ट आरोग्य केंद्र म्हणून निवड करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात येथील अनेक गैरसोयी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. पिण्यासह वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसणे, तसेच दिवस-रात्र स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत बारामती तालुक्यात दोन स्मार्ट पीएचसींची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये मोरगाव आणि होळ या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. मोरगाव येथील आरोग्य केंद्र ज्या इमारतीत पूर्वी सुरू होते त्या संपूर्ण इमारतीचे लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप येथे पूर्णपणे कामकाज सुरू झाले नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करणे किंवा इतर वैद्यकीय सेवा देणे गैरसोयीचे ठरत आहे.

शासनाकडून मंजूर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानेही आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील आठ उपकेंद्रांचा समावेश आहे. मात्र, केंद्राच्या आवारात पिण्यासाठी मुबलक पाणी नसणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राच्या इमारतीपासून काहीच अंतरावर ग्रामपंचायतीची मोठी पाण्याची टाकी असतानाही येथील वापरासाठी पाणी अपुरे पडत असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे प्रलंबित आहे..

दिवस-रात्र सुरक्षा रक्षकाची मागणी

आरोग्य केंद्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच निवासी स्वरूपात राहणाऱ्या सेवकांमध्ये महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक वेळा परिसरातील काही व्यक्ती मद्य प्राशन करून येथील कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. गावात यापूर्वी काही गंभीर घटना घडल्याने जिल्हा परिषदेकडून येथे दिवस-रात्र सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थ आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Smart health center in Morgaon faces water scarcity, security issues.

Web Summary : Morgaon's 'smart' health center struggles with water shortages and security. Staff vacancies hinder services. Locals demand 24/7 security due to past incidents and harassment of female staff.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र