शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST

लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते

पुणे: राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुरावे देत आरोप केले आहेत. त्याचे उत्तर देणारे देवेंद्र फडणवीस कोण आहेत? मुख्यमंत्री कि निवडणूक आयुक्त अशी टीका कॉग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला यांनी केली.पक्षाने प्रदेश कार्यकारिणीसाठी खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांचे आरोप पुराव्यानिशी जाहीरपणे केलेले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत. त्याची उत्तरे फडणवीस का देत आहेत असे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील,नितीन राऊत, नसीमखान यावेळी उपस्थित होते. चेन्नीथला म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते आहे. लोकसभेत आम्ही विजयी होतो व.फक्त ५ महिन्यात विधानसभेला पराभूत हे मतचोरीशिवाय होणार नाही. बिहारमध्ये तेच होईल. बंगळुरातही तेच होणार आहे." भाजपच्या सरकारच्या सर्व गोष्टी आमचे काँग्रेस कार्यकर्ते जनतेपर्यंत घेऊन जातील असे चेन्नीथला यांनी सांगितले. ठाकरे बंधु यांच्या युतीबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले असता चेन्नीथला म्हणाले, एकत्र येणे न येणे तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यात काँग्रेस कशाकरता पडेल? राज व उद्धव यांची बोलणी सुरू आहेत. ती काय आहेत याची महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना माहिती नाही. महाविकास आघाडीबरोबर यासंदर्भात काहीही बोलणी झालेली नाही. महाविकास आघाडीत ते आले तर काय वगैरे प्रश्न जरतर चे आहेत. काँग्रेस त्यावेळी याचा निर्णय घेईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा