रेशन दुकानात अनियमितता, मार्केट यार्डातील दुकानाचा परवाना कायमचा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:53 IST2025-07-24T12:53:27+5:302025-07-24T12:53:54+5:30

शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा हा परवाना होता. मात्र, मंडळाने हा परवाना एका करारनाम्यावर श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे यांच्या नावे केला.

pune news Irregularities in ration shops, license of shop in market yard permanently cancelled | रेशन दुकानात अनियमितता, मार्केट यार्डातील दुकानाचा परवाना कायमचा रद्द

रेशन दुकानात अनियमितता, मार्केट यार्डातील दुकानाचा परवाना कायमचा रद्द

पुणे : शहरातील मार्केट यार्डातील शारदा महिला मंडळाच्या नावाने असलेल्या रास्त भाव दुकानाचा परवाना अनियमिततेमुळे कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. तसेच तपासणीदरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडापोटी ३३ हजार ६६६ रुपये वसुलीचे आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी बजावले आहेत.

या घटनेनंतर शहर व पिंपरीतील सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटांमार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही खताळ यांनी दिल्या आहेत.

शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा हा परवाना होता. मात्र, मंडळाने हा परवाना एका करारनाम्यावर श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे यांच्या नावे केला. असा करार बैकायदेशीर असून, परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर यात तथ्य आढळून आले. हाडे यांनी केलेल्या तपासणीदरम्यान या दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले. त्यात दुकान निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेरावीने बोलणे व धमकावणे, तसेच तपासणीवेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळले.

त्यानंत खताळ यांनी शारदा महिला मंडळाच्या नावे असलेला परवाना क्रमांक ह ३१ कायमस्वरूपी रद्द केला. तसेच शारदा महिला मंडळ सद्य:स्थितीत अस्तित्वात आहे का, याची खातरजमा करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडापोटी ३३ हजार ६६६ रुपयांच्या वसुलीचे आदेशही खताळ यांनी दिले आहेत.

Web Title: pune news Irregularities in ration shops, license of shop in market yard permanently cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.