मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास करेक्ट कार्यक्रम करणार : लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:52 IST2025-11-13T19:51:42+5:302025-11-13T19:52:29+5:30
निवडणुकीत मूळ ओबीसी यांना विविध पक्षांनी तिकीट न दिल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास करेक्ट कार्यक्रम करणार : लक्ष्मण हाके
पुणे : ग्रामीण भागातील ओबीसी समाज हा दुय्यम स्थानी आहे. नगर परिषदेमध्ये ७७ जागा ओबीसींसाठी राखीव असून, मूळ ओबीसी यांच्यासाठी किती जागा दिल्या जाणार आहेत, हे आम्ही बारकाईने पाहणार आहोत.
निवडणुकीत मूळ ओबीसी यांना विविध पक्षांनी तिकीट न दिल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते.
निवडणुकीत ओबीसी यांनी आपले उपद्रव मूल्य दाखवून दिले नाही, तर ज्याप्रमाणे शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसी यांचे राजकारण संपुष्टात आले आहे. त्याप्रमाणे राजकारणातही उरलेसुरले ओबीसी यांची हक्काची राजकीय पदे निघून जातील.
ओबीसी यांना डावलून बोगस कुणबी आणि धनदांडगे यांना दिले जाणार असेल, तर याबाबत बंडखोरी करून ओबीसी यांनी निवडणूक लढवली पाहिजे, असेही ते म्हणाले.