पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 20:48 IST2025-07-25T20:48:04+5:302025-07-25T20:48:30+5:30
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे.

पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीड जप्त; एकाला अटक
पुणे : पुणे विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत केली आहे. 10.47 किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केले आहे. या मादक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किंमत अंदाजे 10.5 कोटी रुपये आहे. संशयास्पद वर्तनावरून अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतले.
अधिकच्या माहितीनुसार, या आरोपीचे नाव अभिनय अमरनाथ यादव असून हा 24 जुलै 2025 रोजी इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-1096 ने बँकॉकहून पुण्यात उतरला होता. कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासणीत हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) सापडला. या प्रकरणी NDPS कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे.
पुणे कस्टम्सचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मादक पदार्थांच्या तस्करीमागील संभाव्य आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
अत्यंत महागडा गांजा
हायड्रोपोनिक गांजा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित वातावरणात पाण्यात वाढवण्यात येणारा उच्च प्रतीचा गांजा प्रकार मानला जातो. त्याचा वापर प्रामुख्याने व्यसनासाठी होतो आणि तो अत्यंत महागडा असतो.