पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मुंढवा येथील जमीन प्रकरणात मालमत्ता पत्रकावर राज्य सरकारची मालकी असताना खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. १८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. जमीन-विक्रीची परवानगी घेण्यापूर्वी जमीन मूल्याच्या ५० टक्के नजराणा भरणे अपेक्षित असताना संबंधित कंपनीने तो न भरताच सातबारा उताऱ्याच्या आधारे व्यवहार पूर्ण केला. यातून १४६ कोटी रुपयांची, तसेच व्यवहार करताना दोन टक्के मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारची १५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात आता, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीचा पत्ता पार्थ पवार यांचा रहिवासी बंगला आहे. यात दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ ही १७ हेक्टर ५१ आर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटादार सदरी मुंबई सरकारचे नाव आहे. हा उतारा बंद झाला असल्याची नोंददेखील आहे, तर इतर हक्कांत कुळाची नावे आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक चार बावधन येथे असून, दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी नोंदणी महानिरीक्षकांसमोर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पक्षकारांनी दस्त नोंदणीच्या कच्च्या आराखड्यात मालमत्ता पत्रक दाखविले. मात्र, अंतिम दस्त करताना हे मालमत्ता पत्रक काढून टाकले, ते लक्षात आले नाही. त्यामुळेच सिटी सर्व्हेनुसार सुरुवातीला राज्य सरकारची मालकी असल्याने या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी राज्य सरकारची परवानगी अपेक्षित होती. विक्रीसाठी जमिनीच्या बाजारमूल्यानुसार ५० टक्के नजराणा भरावा लागतो. या प्रकरणात या जमिनीची सध्याची किंमत २९४ कोटी ६५ लाख ८९ हजार रुपये आहे; त्यानुसार संबंधित पक्षकाराने १४६ कोटी रुपये नजराणा भरणे अपेक्षित होते. मात्र, तो नजराणा न भरताच व्यवहार पूर्ण करण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारचे १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी केलेल्या तपासणीत उघड झाले.
Web Summary : Amedia company allegedly defrauded the government of ₹152 crore in a land deal involving Parth Pawar. The land, worth ₹1800 crore, was acquired for ₹300 crore without paying the required premium, leading to the registration of a case against the company and suspension of an official.
Web Summary : पार्थ पवार की अमेडिया कंपनी पर जमीन सौदे में ₹152 करोड़ की धोखाधड़ी का आरोप है। ₹1800 करोड़ की जमीन ₹300 करोड़ में खरीदी गई, प्रीमियम नहीं भरा गया, जिसके चलते कंपनी पर मामला दर्ज और एक अधिकारी निलंबित।