शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:56 IST

किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

बारामती  - किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी येथील कृषि विज्ञान केंद्रात एकत्रित आले होते. त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील ‘अेआय’ तंत्रज्ञानावर केलेली ऊसलागवड,ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी आदी प्रयोगांची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा काकी यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी माझ्या बहिणी व वहिन्या बरोबर होत्या,असे सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJayant Patilजयंत पाटीलPoliceपोलिसSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार