शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

पुन्हा विश्वगर्जना : चिमुकल्यांच्या भुजंगासनाने रचला योगदिनानिमित्त इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:31 IST

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड  : पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूरात एकाच वेळी योगासने 

पुणे : योग हे केवळ शरीराचे आसन नसून, आत्म्याची शुद्धता आणि मनाची स्थिरता प्राप्त करण्याचा मार्ग आहे. हाच मार्ग स्वीकारत राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हजारो चिमुकल्यांनी गुरुवारी योग साधला. योगदिनाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी अनेक शहरात चिमुकल्यांनी भुजंगासन करून जागतिक विक्रम घडवला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. योगसंपन्न भारताच्या भूमीवर संस्कारांची पाळंमुळ खोलवर रुजलेली आहेत. या संस्कारांचीच एक प्रेरणादायक झलक या माध्यमातून दिसून आली. या ऐतिहासिक क्षणाने केवळ जागतिक विक्रम नोंदला गेला नाही, तर भावी पिढीला आरोग्यदायी आणि संस्कारित जीवनाचा मंत्रही मिळाला.ऐतिहासिक दिवशी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांतील शाळांमधील मुलांनी एकाच वेळी भुजंगासन करत ‘योग’ ही आपल्या जीवनशैलीचा भाग आहे, हे जगाला दाखवून दिलं. लोकमत आणि लोकमत कॅम्पस क्लब प्रस्तुत, सुहाना प्रवीण मसाले आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने हा विश्वास विक्रम पावसाच्या सरींच्या साक्षीने या चिमुकल्यांनी मनोभावे करत विश्व विक्रमाला गवसणी घातली. या विश्व विक्रमाला विलास जावडेकर डेव्हलपर्स, अमर बिल्डर, मुक्ता ट्रेड, आशा भेळ, चाटे स्कूल, ऑक्सिरिच यांचे सहकार्य लाभले.यावेळी कॅम्पस क्लब आणि लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, संपादक संजय आवटे, खंडेराय प्रतिष्ठानचे डॉ. सागर गणपतराव बालवाडकर, गणपतराव बालवाडकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ऋषी नाथ, मिलिंद वरलेकर, योगा प्रशिक्षक भूषण देशपांडे, योगा फिटनेस कोच राजश्री राणे, सचिन पांडे, उमेश थोपटे, चंद्रकांत पाटील आणि ॲॅड. देवकी बाम, लोकमतचे राज्याचे इव्हेंट प्रमुख रमेश डेडवाल, लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

 शिक्षणाबरोबर मुलांवर योग संस्कार 

बालवयातच शरीराची, मनाची आणि श्वासाची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाने लहानग्यांच्या मनात एक वेगळंच समाधान आणि आत्मविश्वास जागवला. भुजंगासनासारखं शरीर लवचिक ठेवणारं आसन करताना मुलांनी एकाग्रतेचा आणि शिस्तीचा मनमुराद आनंद घेतला.शिक्षणाबरोबर मुलांवर योग संस्कार : सध्याची धावपळीची जीवनशैली प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे कमी वयात अनेकांना आजार जडतात. या उपक्रमाने एक महत्त्वाचा संदेश दिला ते म्हणजे शिक्षण फक्त पुस्तकीज्ञानापुरते मर्यादित नसून, ते शरीर, मन, विचार आणि संस्कृती यांचं एक सुंदर मीलन असावं आणि हे मीलन घडवणारे हे लहानसे योद्धे आजच्या भारताचे खरे ‘योगदूत’ ठरले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडYogaयोगासने प्रकार व फायदे