'आयटी'त नोकरीच्या बहाण्याने फसवणूक; कंपनीच्या संचालकांवर आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:46 IST2025-09-03T15:42:36+5:302025-09-03T15:46:29+5:30

- संशयितांनी वेगवेगळी कारणे देऊन कामावरून काढून आयटी क्षेत्रातील फ्रेशर्सचा विश्वासघात केल्याचा आरोप

pune news fraud under the pretext of a job in IT; Another crime against company directors | 'आयटी'त नोकरीच्या बहाण्याने फसवणूक; कंपनीच्या संचालकांवर आणखी एक गुन्हा

'आयटी'त नोकरीच्या बहाण्याने फसवणूक; कंपनीच्या संचालकांवर आणखी एक गुन्हा

पिंपरी : फ्लायनाट सास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी आयटी अभियंत्यांची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर याबाबत २३ ऑगस्ट रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता सोमवारी (दि. १ सप्टेंबर) दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संचालकाला अटक केली आहे.

राहुल जगन्नाथ शिंदे (२४, रा. पिंपरी ता. भोकरदन, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लायनाट सास कंपनीचे संचालक उपेश रणजित पाटील (३७, रा. रावेत), रोहन अंबुलकर (रा. नागपूर) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या इतर मित्रांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस ऑनलाइन प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले. कोणतेही प्रकल्प न देता संशयितांनी वेगवेगळी कारणे देऊन त्यांना कामावरून काढून टाकले. अशा प्रकारे संशयितानी आयटी फ्रेशर्सचा विश्वासघात केला.

Web Title: pune news fraud under the pretext of a job in IT; Another crime against company directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.