उरळी कांचन : हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ येथे विजयादशमीनिमित्त करण्यात आलेल्या शस्त्र पूजनावेळी एकाने हवेत गोळी झाडल्याची खळबळजनक घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस), तसेच शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अटकेत आहे.फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमित नंदकुमार वाघ (वय 34, रा. लोणीकाळभोर, सध्या नेमणूक उरुळी कांचन पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य बाजीराव कड (वय 28, रा. कोरेगाव मुळ) , जयसिंग वामनराव तांबे उर्फ भोसले (वय 71, रा. कोरेगाव मुळ) या आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1138373368246034/}}}}समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य कड याने कोणताही शस्त्र परवाना नसताना हवेत गोळी झाडली. गोळीबार करताना तो निष्काळजी व अविचारी पद्धतीने वागल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे परिसरातील लोकांचे जीव धोक्यात आले होते. विशेष म्हणजे, आरोपी क्रमांक २ जयसिंग तांबे यांनीच अजिंक्यला शस्त्र दिल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ कारवाई करत अजिंक्य कड याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बीएनएस कलम १२५ ३(५), व शस्त्र कायदा ३/२५, ३० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग तांबे यांना बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजगिरे करत असून, पुढील चौकशी सुरू आहे.
Web Summary : A man fired a gun during Vijayadashami celebrations in Koregaon Mul. Police arrested Ajinkya Kad, filing charges under BNS and Arms Act. Jaysing Tambe was served a notice for providing the weapon. Investigation ongoing.
Web Summary : कोरेगांव मुल में विजयादशमी समारोह के दौरान एक व्यक्ति ने गोली चलाई। पुलिस ने अजिंक्य कड को गिरफ्तार किया, बीएनएस और शस्त्र अधिनियम के तहत आरोप दर्ज किए। जयसिंग तांबे को हथियार प्रदान करने के लिए नोटिस दिया गया। जांच जारी है।