शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:00 IST

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते.

- किरण शिंदेपुणे -  राजकारणात सतत चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतरच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की धंगेकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाणार. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळख निर्माण करत रवींद्र धंगेकर यांची शिवसेना (शिंदे गट) च्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती एक वर्षासाठी आहे. ही नियुक्ती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे.महानगर प्रमुख म्हणून काय जबाबदारी?पुणे महानगर प्रमुखपद ही शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असेल.धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. त्यांच्या या विजयामुळेच त्यांना शिंदे गटाकडून महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती.पक्षातील रणनीतीचे नवे समीकरणया नियुक्तीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने पुण्यात आपली ताकद वाढवण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये घेणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर संघटना नव्याने सज्ज होणार असून, पक्षाला पुन्हा एकदा पुण्यात मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. ही नियुक्ती धंगेकर यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा असून, येत्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असेल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024