भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरवाव्यात;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:53 IST2025-07-22T19:52:02+5:302025-07-22T19:53:27+5:30

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रशासन व मंदिर समितीने अधिकृत संकेतस्थळ स्थापन करुन येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा तत्काळ मिळतील, अशी व्यवस्था करावी

pune news facilities should be provided to devotees coming to Bhimashankar; District Collector Jitendra Dudi | भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरवाव्यात;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरवाव्यात;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

पुणे : श्रावण महिन्यात होणारी गर्दी व विविध सुविधा यांचा विचार करून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रशासन व मंदिर समितीने अधिकृत संकेतस्थळ स्थापन करुन येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा तत्काळ मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीते ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, प्रशासकीय व्यवस्थापक प्रमोद शिर्के, सहकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, खेडचे तहसीलदार प्रशांत बेद्रे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक उपस्थित होते.

श्रावण महिन्यात येत्या सोमवारपासून भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एक रांग व्हीआयपी दर्शन व दुसरी साधी दर्शन रांग अशा दोन रांगेत दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच दर्शन, पूजा करण्यासाठी निश्चित टप्पा तयार करावे. वाहनतळाची ठिकाणे पोलिस विभागाने निश्चित करावीत. वन विभागानेही पाहणी करुन रस्त्यातील अडथळे दूर करावेत. भाविकांची गैरसोय होऊ नये व त्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करुन दक्ष राहण्याच्या सूचनाही डुडी यांनी दिल्या.

या कामास प्राधान्य देऊन येत्या रविवारपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच मंदिर परिसर, भीमाशंकर गाव, मंचर या ठिकाणी क्यूआर कोडबाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, ज्याद्वारे व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच क्यूआर कोडद्वारे मंदीर संस्थानमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध होईल त्या दृष्टीने व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.

Web Title: pune news facilities should be provided to devotees coming to Bhimashankar; District Collector Jitendra Dudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.