पुण्याच्या वाघोलीमध्ये लिफ्ट कोसळली, घटना CCTV मध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:16 IST2025-09-16T18:10:24+5:302025-09-16T18:16:38+5:30
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असे एकूण सहा जण होते.

पुण्याच्या वाघोलीमध्ये लिफ्ट कोसळली, घटना CCTV मध्ये कैद
पुणे - पुण्यातल्या वाघोली परिसरातील एका इमारतीमध्ये लिफ्ट कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असे एकूण सहा जण होते. लिफ्ट अचानकपणे कोसळल्याने लिफ्टमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही संपूर्ण घटना इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. लिफ्ट कोसळल्यानंतरही लिफ्टमधील सर्वजण सुखरूप बाहेर आले. या घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अशा घटनांची गंभीर दखल घेऊन लिफ्टच्या नियमित तपासणीची मागणी होत आहे. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.