Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:02 IST2026-04-07T17:44:48+5:302026-04-07T18:02:55+5:30

- ईसीआयनेटवर ‘सी-सिव्हिजल’ या ॲपद्वारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविता येतात, तर ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा पुरविण्यात येत आहेत.

pune news ECInet facility for voters in Baramati by-election; Detailed information of candidates on one click | Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

बारामती :बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना उमेदवारांविषयी सविस्तर व पारदर्शक माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सामाजिक माध्यमांवरील खात्यांची माहिती ‘आपला उमेदवार जाणून घ्या’ या घटकाद्वारे पाहता येणार आहे.

मतदारांना ईसीआयनेटमधील “निवडणूक प्रक्रिया” या विभागांतर्गत हा घटक सहज उपलब्ध असून, त्याद्वारे उमेदवारांनी सादर केलेले संपूर्ण प्रतिज्ञापत्र (फॉर्म २६) देखील उतरवता येणार आहे. यामुळे मतदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होणार आहे. ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा व्यासपीठ असून, भारतातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ४० हून अधिक ॲप्स व संकेतस्थळे एकत्रित करून एकसंध डिजिटल अनुभव देण्यात आला आहे. या व्यासपीठाद्वारे मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती पाहणे, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद, ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड, मतदानाचे प्रवाह तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

याशिवाय, ईसीआयनेटवर ‘सी-सिव्हिजल’ या ॲपद्वारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविता येतात, तर ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा पुरविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा एकाच सुरक्षित व्यासपीठावर उपलब्ध असल्याने मतदारांना तत्काळ माहिती व तक्रार निवारणाची प्रभावी सोय मिळत आहे. बारामती पोटनिवडणुकीत पारदर्शक, सुजाण आणि सक्रिय मतदानासाठी मतदारांनी ईसीआयनेटचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Web Title : बारामती उपचुनाव में मतदाताओं के लिए 'ईसीआईनेट' की सुविधा: एक क्लिक पर उम्मीदवारों की जानकारी

Web Summary : ईसीआईनेट बारामती के मतदाताओं को विस्तृत जानकारी प्रदान करता है: आपराधिक इतिहास, संपत्ति, शिक्षा और सोशल मीडिया। मतदाता हलफनामे डाउनलोड कर सकते हैं। प्लेटफ़ॉर्म मतदाता पंजीकरण, शिकायत दर्ज करने और विकलांगता सेवाएं प्रदान करता है। ज़िला कलेक्टर ने ईसीआईनेट के माध्यम से मतदाता भागीदारी का आग्रह किया।

Web Title : ECINET Facilitates Baramati By-Election Voters with Candidate Information

Web Summary : ECINET provides Baramati voters detailed candidate info: criminal history, assets, education, and social media. Voters can download candidate affidavits. The platform offers voter registration, complaint filing, and disability services. District Collector urges voter participation via ECINET.