पिंपरी : पवार कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. शिवाय मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. पूरग्रस्त भागात वाईट स्थिती आहे. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच याच कारणांमुळे शरद पवारही दिवाळी साजरी करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.१५) येथे पिंपरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. दरवर्षी बारामती येथे पवार कुटुंबाच्या वतीने दिवाळी पाडवा साजरा होतो. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पवार कुटुंबाचे हितचिंतक येत असतात. मात्र यंदा पाडवा साजरा होणार की नाही, याविषयी संभ्रम होता. तो अजित पवार यांनी दूर केला. ते म्हणाले की, आमच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. शिवाय मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबीयांचा पाडवा होणार नाही.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.१५) येथे पिंपरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. दरवर्षी बारामती येथे पवार कुटुंबाच्या वतीने दिवाळी पाडवा साजरा होतो. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पवार कुटुंबाचे हितचिंतक येत असतात. मात्र यंदा पाडवा साजरा होणार की नाही, याविषयी संभ्रम होता. तो अजित पवार यांनी दूर केला. ते म्हणाले की, आमच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. शिवाय मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबीयांचा पाडवा होणार नाही. पवार म्हणाले की, पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अनेकजण त्यांच्या घरी फराळ पाठवत आहेत. काही जण शिधाही पाठवत आहेत. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत करून त्यांना उभे करता येईल, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.नक्षलवाद कमी झाला...आत्मसमर्पण होत असले तरी नक्षलवाद आटोक्यात येणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बुधवारी अजित पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदे एकेकाळी गृहमंत्री होते. तेव्हाच्या परिस्थितीमुळे ते बोलले असतील. पण आता परिस्थिती खूप सुधारली आहे. नक्षलवाद कमी झाला आहे. तेथे मोठे औद्योगिकीकरण होत आहे. रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेकांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिवृष्टीचे पॅकेज देण्यात आले असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
Web Summary : The Pawar family will not celebrate Diwali Padwa this year due to a death in the family and the flood situation in Marathwada. Ajit Pawar announced this, stating their priority is assisting flood-affected farmers. Sharad Pawar will also forgo celebrations.
Web Summary : पवार परिवार इस वर्ष शोक और मराठवाड़ा में बाढ़ के कारण दिवाली पड़वा नहीं मनाएगा। अजित पवार ने घोषणा की कि उनकी प्राथमिकता बाढ़ प्रभावित किसानों की सहायता करना है। शरद पवार भी उत्सव नहीं करेंगे।