दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार; खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:07 IST2025-09-21T15:06:29+5:302025-09-21T15:07:13+5:30

- उद्यापासून खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

pune news dry fruits will become cheaper and sweeter during Dussehra and Diwali | दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार; खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार; खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त

पुणे : नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्के करण्यात आले आहे.

यामुळे खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर, आक्रोड, जर्दाळू आदी सुकामेवा प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवरात्र उत्साहात मोठ्या प्रमाणात उपवास केला जातो. सर्वसामान्य ग्राहकांना नवरात्रीच्या निमित्ताने सुकामेवा स्वस्त झाल्याने सामान्यांच्या आवाक्यात दर आले आहेत. त्यामुळे सामान्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस उपवास असल्याने शहर व उपनगरांतून ड्रायफ्रूट सुकामेव्याला मागणी अधिक सर्वसामान्य ग्राहकांना ड्रायफ्रूटचे दर कमी झाल्याने दिलासा मिळणार आहे.

- नवरात्रात खजुराला मागणी जास्त : खजूर ३५० वरून ३१५ रुपये प्रतिकिलो

- नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवासात ड्रायफ्रूटमध्ये खजुराची मागणी अधिक असते. यामध्ये पिवळ्या व काळ्या खजुरांना जास्त मागणी असून ते सामान्य नागरिकांना इतर फळां पेक्षा परवडत आहे. उपवासात खजुरापासून जास्त कॅलरीज मिळतात आणि हे खाल्याने जास्त थकवा वाटत नाही. त्यामुळेच याला जास्त मागणी आहे आणि सामन्यांच्या आवाक्यात असल्याने नागरिक खजुरांना पसंती देत आहेत. यंदा खजूर किलोमागे ४० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सोमवार (दि. २२) सप्टेंबरपासून असे होणार दर

प्रकार आताचे दर प्रतिकिलो आणि जीएसटी दर कमी दर

खजूर ३३६                        ३१५

बदाम ८९६                        ८४०

पिस्ता १२५० ११५०

आक्रोड १२५० ११५०

अंजीर। १५०० १३००

खारीक २८० २५०

जर्दाळू ५०० ४००
 

- इराण, अफगाणिस्तान या देशातून खजुरांची आयात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत खजुरांच्या भावात २५ टक्के घट झाली आहे. यंदा मात्र केंद्र सरकारने १२ टक्क्यांवरून ५ टक्के जीएसटी केल्याने ड्रायफ्रूट दरात घट झाली असून ३६० चा खजूर २७० पर्यंत आला आहे. यामुळे सामन्यांकडून मागणी वाढणार असून हे दर दसरा, दिवाळीमध्येही असेच राहणार असून सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे - नवीन गोयल ड्रायफ्रूट व्यापारी व दी पूना मर्चंट चेंबर सदस्य 

नवरात्र उत्साहात : आमच्या घरामध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. यावर्षी उपवास केल्यामुळे, ड्रायफ्रूट स्वस्त मिळाल्याने दिवाळी गोड होणार आहे.  - नकुल जोशी उपहासक

 

Web Title: pune news dry fruits will become cheaper and sweeter during Dussehra and Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.