ही नको, दुसरी दाखवा; घोटावडे गावात महिलांच्या टोळीने केली साड्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 21:27 IST2025-08-08T21:26:16+5:302025-08-08T21:27:26+5:30
- या महिलांना मात्र कल्पनाही नव्हती की त्यांचा हा कारनामा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड

ही नको, दुसरी दाखवा; घोटावडे गावात महिलांच्या टोळीने केली साड्यांची चोरी
पुणे - घोटावडे गावात महिलांच्या टोळीने साड्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानात खरेदीसाठी आल्याचा बहाणा करून ४ ते ५ महिलांचा गट साड्यांची निवड करत होता. "ही नको, दुसरी दाखवा… आणखी दाखवा" असं सांगत त्यांनी दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि संधी साधून अनेक साड्या लंपास केल्या.
या महिलांना मात्र कल्पनाही नव्हती की त्यांचा हा कारनामा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे. फुटेजमध्ये त्या साड्या पिशवीत टाकताना स्पष्ट दिसत आहेत.
घटनेनंतर दुकानदाराने सीसीटीव्हीचा व्हिडिओ पोलीसांकडे सुपूर्द केला असून, आरोपी महिलांचा शोध सुरू आहे. पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, खरेदीदरम्यान अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली तात्काळ कळवाव्यात असे सांगितले आहे.