आळंदी : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचे पडसाद आता स्थानिक जनजीवनावरही उमटू लागले आहेत. नैसर्गिक वायू व इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने आळंदी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील गॅस एजन्सींकडे सिलिंडरचा पुरवठा अचानक घटल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भरउन्हात तासनतास उभे राहूनही गॅस मिळेलच याची शाश्वती नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या परिस्थितीमुळे अनेकांना नोकरी-व्यवसाय तसेच घरातील महत्त्वाची कामे बाजूला ठेवून रांगेत उभे राहावे लागत आहे.
विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या टंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता, मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या गॅस बुकिंगची संख्या वाढली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्याची माहिती वितरकांकडून देण्यात येत आहे.
दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा
गॅस बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक एजन्सी कार्यालयात जाऊन चौकशी करत असले तरी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने वितरण प्रक्रिया मंदावल्याचे उत्तर त्यांना मिळत आहे.
Web Summary : Alandi grapples with gas cylinder scarcity due to international tensions. Citizens face long queues and uncertainty. Supply disruptions impact daily life significantly, especially for women and seniors, causing delays and frustration.
Web Summary : अंतर्राष्ट्रीय तनाव के कारण आलंदी में गैस सिलेंडर की कमी है। नागरिक लंबी कतारों और अनिश्चितता का सामना कर रहे हैं। आपूर्ति व्यवधानों से दैनिक जीवन प्रभावित, विशेषकर महिलाओं और वरिष्ठ नागरिकों को परेशानी।