"छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?" उदयनराजेंचा सरकारला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:28 IST2025-03-29T11:20:45+5:302025-03-29T11:28:07+5:30

औरंगजेबाच स्टेटस ठेणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा; उदयराजेंनी केली मागणी

pune news Does the Chief Minister drink milk with a straw? A scathing criticism from Chhatrapati udayanraje bhosale | "छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?" उदयनराजेंचा सरकारला घरचा अहेर

"छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?" उदयनराजेंचा सरकारला घरचा अहेर

पुणे - पुणे जिल्ह्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336 वि पुण्यतिथी साजरी केली जाते आहे. त्यासाठी उदयनराजे वडू येथे आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केले. सातत्याने होणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या अवमानावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. औरंगजेबाच स्टेटस ठेणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे.असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण ? मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? असं म्हणत उदयनराजेंनी सरकारलाच सुनावले आहे.  

उदयनराजे पुढे म्हणाले, ज्या स्वराज्यात आपण सगळे राहतोय त्या स्वराज्याच्या संकल्पना शिवाजी महाराजांची होती. सर्वधर्मसमभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणलं. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. आपल्यातल्या कोणीच देव बघितला नाही.  शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक युगपुरुष जन्माला आले त्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झाले नाही. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही. अवमान करणाऱ्यावर मोकासारखा कायदा आहे. तो लागू झाला पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आपले लोकप्रतिनिधींना शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावं असं वाटतं का ? त्यांना जर तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनं सिद्ध केलं पाहिजे. मात्र आंतरराष्ट्रीय स्मारकसाठी काही तरतूद नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला नाही. त्यानंतर झालेल्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहे.
 

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत १६ नक्षलवादी ठार, दांतेवाडामध्ये शोधमोहिमेला वेग  
 

ते पुढे म्हणाले, मुंबईत स्मारक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. इथे स्वराज्य सर्किट स्थापन केले पाहिजे. रोजगार उपलब्ध होईल आणि टुरिस्ट स्पॉट उपलब्ध होईल. शासन मान्य इतिहास प्रकाशित ना केल्याने अनेकांकडून सिनेमॅटिक लिबर्टी घेतला जातो. सेन्सॉर बोर्डमध्ये इतिहास संशोधक हवेत. शहाजी महाराजांची समाधीसाठी निधी उपलब्ध करु द्यावा. आपण इतिहास विसरलो तर तुमची आमची लायकी आणि ओळख काय? विशेष अधिवेशन बोलून कायदा परित करावा तरच विकृतीला आळा बसेल.  पश्या राव्हल्या असे लोक ज्यांना समजात कोणतीही किंमत नाही असे लोक शिवाजी महाराजांवर काहीही बोलण्याचं धाडस देखील करतील का?  शिवाजी महारांचा अवमान करतात कायदा आला तर त्यांची हिंमत होणार नाही.

वाघ्या श्वानाच्या प्रकरणावर बोलतांना उदयनराजे म्हणाले,'वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे शिवाजी महाराज. मुख्यमंत्री यांनी ऐकल पाहिजे सरकारच्या सगळ्यांना कळायला पाहिजे. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का? अवमानबाबत त्यांना कळायला हवं' असं म्हणत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.

Web Title: pune news Does the Chief Minister drink milk with a straw? A scathing criticism from Chhatrapati udayanraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.