शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वपूर्ण : जितेंद्र डुडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:21 IST

- शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी.

पुणे : ‘शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वाचे आहे. हे अभियान यशस्वी करण्याकरिता गाव पातळीवर शेतकऱ्यांचे गट तयार करा, त्यांना प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावातच मास्टर प्रशिक्षक तयार करा, निर्यातदारांची साखळी तयार करून शेतकऱ्यांना निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.दिशा कृषी उन्नतीची या योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. धीरज शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. डुडी म्हणाले, ‘जिल्ह्यात ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ हा आराखडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडई, डाळिंब, सीताफळ आणि द्राक्ष या पिकांचे क्लस्टर करण्यावर भर देण्यात येत आहे.निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कालबद्ध कार्यक्रम राबवून अधिकाधिक पिकांची निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. या पिकांना सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाणी, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ, निर्यातसाखळी तयार करून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कामे करावी लागणार आहेत.’शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. तालुका मंडळ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्मिती करावी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील असून, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही डुडी यांनी दिली. काचोळे म्हणाले, ‘या अभियानांतर्गत केळी, आंबा, अंजीर, स्टॉबेरी, द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. येत्या काळात सूर्यफूल, करडई, सीताफळाखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे.’

English
हिंदी सारांश
Web Title : Disha Krishi Unnati Abhiyan vital for farmer empowerment: Jitendra Dudi.

Web Summary : Jitendra Dudi emphasized Disha Krishi Unnati Abhiyan for farmer empowerment through income enhancement. He urged creating farmer groups, master trainers, and export chains. Focus on cluster-based farming of crops like banana, mango, and grapes using modern tech for increased exports and reduced costs with government support.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र