शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख विभागात एक हजार अतिरिक्त पदांची निर्मिती; नव्या आकृतिबंधाला राज्य सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:02 IST

भूमी अभिलेख विभागात एक हजार अतिरिक्त पदांची निर्मिती, नव्या आकृतिबंधाला राज्य सरकारची मंजुरी

पुणे : राज्यातील भूमी अभिलेख विभाग तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने विभागाचा नवीन आकृतिबंध मंजूर केला असून, त्यामध्ये ९९४ नव्या पदांची भर घालण्यात आली आहे. नवीन आकृतिबंधानुसार एकूण पदांची संख्या १० हजार ६८३ झाली आहे. त्यात एक अतिरिक्त जिल्हाधिकारी, तर तीन उपजिल्हाधिकारी पदांची नव्याने निर्मिती केली आहे.

राज्यातील आठही प्रादेशिक विभागांत एक अतिरिक्त जिल्हा अधीक्षक कार्यालय, तसेच संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे विभाजन करून लातूर प्रादेशिक विभाग करण्यात येणार आहे. या आकृतिबंधानुसार आता शिपाई पद रद्द केले असून, ते बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विभागाची प्रशासकीय क्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील वाढत्या शहरीकरणामुळे, तसेच जमिनीच्या नोंदी, मोजणी, फेरमोजणी, डिजिटल नकाशे आणि जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाचा सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला. या आकृतिबंधात तांत्रिक आणि प्रशासकीय अशा विविध स्तरांवरील अतिरिक्त ९९४ पदांचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून डिजिटल सातबारा, ई-नकाशे, ऑनलाइन मोजणी अर्ज, भू-नकाशांचे संगणकीकरण अशा अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन हा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. या निर्णयामुळे प्रलंबित मोजणी प्रकरणे कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना जमिनीशी संबंधित सेवा मिळण्यासाठी होणारा विलंब कमी होईल. भूमी अभिलेख विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या आकृतिबंंधात महत्त्वाच्या पदांमध्ये उपअधीक्षक ८४ पदे, शिरस्तेदार २०१, परीरक्षण भूमापक ११७६, तसेच भूकरमापक ७० पदांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात परीरक्षण भूमापकांचे १३९२ साजे असून, त्यात आता ११७६ साज्यांची वाढ होणार आहे. नवीन आकृतिबंधात शिपाई संवर्गातील पदे रद्द करण्यात आली असून, सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील नियमित कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा अन्य कारणांमुळे हे पद रिक्त झाल्यावर ते आपोआप रद्द होईल. त्यानंतर हे पद बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येईल. त्यानुसार ज्या प्रमाणात नियमित पदे कमी होतील. त्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या पदांच्या संख्येत वाढ होईल.

उपसंचालक भूमी अभिलेख यांचे १ नवीन कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ८ नवीन कार्यालये, नगर भूमापन अधिकारी यांच्या २३ नवीन कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे, तसेच विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची ५ नवीन कार्यालये व विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांची १२ नवीन कार्यालये निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या कार्यालयांचे ठिकाण कामकाजाच्या स्वरूपानुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख हे ठरवतील. 

सध्या भूमी अभिलेख विभाग पोटहिस्सा मोजणी, पाणंद रस्ते, मालमत्ता पत्रक अशा महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या निर्णयामुळे या प्रकल्पांना गती मिळणार आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, पुणे

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Land Records Department gets 1000 new posts approved.

Web Summary : Maharashtra approves 994 new posts for Land Records Department, boosting efficiency. New offices and technology upgrades will expedite land-related services for citizens.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र