पुणे - सोशल मीडियावर सध्या एक खळबळजनक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याचे दिसून येत आहे. ही घटना पुण्यातील रविवार पेठेतील कापड गल्ली परिसरातील असून अनेकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ चक्क गाय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्याचे दिसून येत आहे. ही गाय नेमकी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेली कशी असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तर व्हिडिओमध्ये गायीला अग्निशामक दलाकडून खाली आणण्यासाठी शर्तीचे पर्यंत करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
या परिसरातील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर एक गाय गेली खरी, पण तिला खाली पुन्हा येता येईना. अग्निशमन दलाच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने गाईला खाली उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करत गाय दुसऱ्या मजल्यावर गेली. मात्र वर गेल्यानंतर ती खाली येऊ शकली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी विशेष क्रेनच्या साहाय्याने गाईला सुखरूप खाली उतरवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.