शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:45 IST

ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, या प्रक्रियेत गोपनीयता पाळली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बिहारच्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या, किंपर घुंगट घालून घेणाऱ्या महिला मतदारांची ओळख पटवली जात असताना त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचू नये म्हणून निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करणार आहे. यानुसार, अशा महिलांची ओळख पटविताना महिला मतदान अधिकारी किंवा स्वयंसेविकांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.

ही ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, या प्रक्रियेत गोपनीयता पाळली जाईल. सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बुरखाधारी महिलांची ओळख पटविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाईल, असे जाहीर केले होते. 

ओळख पटविण्याच्या या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले होते. यासाठी राज्यात ९०,७१२ अंगणवाडी सेविकांना निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात येणार आहे. गेल्या शनिवारी भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी बुरखाधारी महिलांचे चेहरे त्यांच्या आधार कार्डशी पडताळले जावेत, अशी मागणी केली होती. बिहारमध्ये २४३ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यांत ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. 

काँग्रेस, राजदमध्ये जागावाटपावरून मतभेदबिहार विधानसभा निवडणुकीसाठी सीट वाटपाच्या मुद्द्यावरून महागठबंधनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यात जागा वाटपावरून तीव्र मतभेद झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही स्थितीत दुय्यम भूमिका स्वीकारायची नाही, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. राजदइतक्या जागा काँग्रेस लढविणार नसला तरी तो पक्ष बिहारमध्ये आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेस आता जिथे विजयाची शक्यता जास्त आहे, अशाच जागांवर हक्क सांगत आहे

नितीशकुमार यांना धक्काराजकीय हालचालींमध्ये पक्षांतराचा खेळ वेग घेत आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याआधीच जेडीयूला मोठा धक्का बसला आहे. संतोष कुशवाहा हे दोन वेळ खासदार झालेले तसेच नितीशकुमार यांचे निकटवर्तीय संजय कुशवाहा, माजी खासदार जगदीश शर्मा यांचे पुत्र व माजी आमदार राहुल शर्मा, बांका येथील विद्यमान जेडीयू खासदार गिरधारी यादव यांचे पुत्र राहुल शर्मा चाणक्य प्रकाश आदी नेते राजदमध्ये सामील झालेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Elections: Anganwadi Workers to Help Identify Veiled Women Voters

Web Summary : Bihar election officials will use Anganwadi workers to identify veiled women voters while maintaining their dignity. This follows concerns raised about verifying voters' identities. Political tensions rise with party defections before nominations.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५