पुणे : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
षार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषीकेश परदेशी, अभिमन्यू मैड अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हनुमंत दिगंबर पवार (४१, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामगुडे आणि पवार हे सोमवारी सायंकाळी एका वृत्तवाहिनीच्या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वार्तालाप संपल्यानंतर दामगुडे आणि पवार हे मित्रमंडळ चौकातील पदपथावर थांबले. त्या वेळी दामगुडे आणि पवार यांच्यात बाचाबाची झाली. ‘तू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतो. तुला हर्षवर्धन सपकाळ यांचा एवढा पुळका का आहे. पुण्यात राहायचे असेल, तर नीट रहा,’ अशी धमकी देऊन दामगुडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. दामगुडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी मारहाण केली, असे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.
Web Summary : Hindutva activist Tushar Damgude and accomplices booked for threatening Congress spokesperson Hanumant Pawar with a pistol and assaulting him after a debate. The incident occurred after Pawar allegedly criticized BJP. Police are investigating the case.
Web Summary : हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडे और साथियों पर कांग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार को पिस्तौल से धमकाने और बहस के बाद हमला करने का मामला दर्ज। पवार द्वारा कथित तौर पर भाजपा की आलोचना करने के बाद यह घटना हुई। पुलिस मामले की जांच कर रही है।