पुणे : शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच देशभरातून अनेक तरुण-तरुणी पुणे शहरात येतात. त्यांच्यासाठी शहरभरात अनेक मेस आणि हॉस्टेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे काही मेस चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहरातील जंगली महाराज रोड परिसरातील एका गर्ल्स हॉस्टेलमधील मेसमध्ये कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. या मेसमध्ये दररोज सुमारे दोनशेहून अधिक मुलींसाठी जेवण बनवले जाते. गॅस नसल्याने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे अवघड ठरत असून, मेस चालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलीचा आधार घेतला आहे.
Web Summary : A commercial gas shortage in Pune forces a girls' hostel mess to cook on traditional stoves. Serving over 200 students daily, the mess faces challenges with time and smoke. Owners urge a quick resumption of gas supply to ensure timely meals.
Web Summary : पुणे में वाणिज्यिक गैस की कमी के कारण एक गर्ल्स हॉस्टल मेस को पारंपरिक चूल्हे पर खाना बनाना पड़ रहा है। प्रतिदिन 200 से अधिक छात्रों को भोजन परोसने वाली मेस को समय और धुएं की चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। मालिकों ने समय पर भोजन सुनिश्चित करने के लिए गैस की आपूर्ति जल्द शुरू करने का आग्रह किया।