पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:38 IST2025-08-13T13:38:22+5:302025-08-13T13:38:47+5:30
दारू पिऊन घरात आले आणि त्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यावरून दोन महिने हाताला प्लास्टर घालावे लागले

पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल
दौंड : पत्नी आणि मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पुणे येथील कृषी विभागाचे सहायक पर्यवेक्षक बाळासाहेब तुकाराम डमरे (रा. गोपाळवाडी रोड, दौंड) आणि त्याची मैत्रीण सुवर्णा बसप्पा टक्कलगी (वय ३६, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संदर्भात आरोपीची पत्नी गंगा बाळासाहेब डमरे (रा. गोपाळवाडी रोड, दौंड) यांनी दौंड न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दौंड पोलिसांना दिले असून, पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
गेल्या वर्षापासून पती बाळासाहेब डमरे सातत्याने मारहाण करत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, मुंबई येथे हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी बाळासाहेब डमरे दारू पिऊन घरात आले आणि त्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यावरून दोन महिने हाताला प्लास्टर घालावे लागले. तसेच मुलालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि अश्लील शिवीगाळ केली. यावेळी आरोपीसोबत आलेली सुवर्णा टक्कलगी यांनी घरातील रक्कम चोरून पळून गेल्याची तक्रार फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड करत आहेत.