ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कासुर्डीत घरफोडीचा प्रयत्न फसला; गावकऱ्यांची एकजूट ठरली निर्णायक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:03 IST2026-01-11T19:01:59+5:302026-01-11T19:03:27+5:30

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून संपूर्ण गावाला सतर्कतेचा संदेश दिला.

pune news burglary attempt in Kasurdi foiled due to vigilance of village security forces; Unity of villagers proved decisive | ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कासुर्डीत घरफोडीचा प्रयत्न फसला; गावकऱ्यांची एकजूट ठरली निर्णायक 

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कासुर्डीत घरफोडीचा प्रयत्न फसला; गावकऱ्यांची एकजूट ठरली निर्णायक 

भांडगाव : कासुर्डी (ता. दौंड) येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ आणि प्रभावी वापरामुळे एक मोठा अनर्थ टळला. शनिवारी, १० जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ३:३० वाजता गावातील माजी सरपंच पांडुरंग आखाडे यांच्या घरी ३ ते ४ चोरांनी घरफोडीचा प्रयत्न केला. कुलूप तोडून घरात प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना, आखाडे यांनी तत्काळ गावच्या पोलिस पाटील अश्विनी सोनवणे यांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून, पोलिस पाटील सोनवणे यांनी तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून संपूर्ण गावाला सतर्कतेचा संदेश दिला. काही मिनिटांतच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

संपूर्ण गाव जागे झालेले पाहून चोरांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला, ज्यामुळे संभाव्य चोरी आणि पुढील अनर्थ टळला. कासुर्डी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि पोलिस पाटील यांच्या समन्वयातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे. जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व ग्रामपंचायतींना या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ विभागीय अधिकारी नियंत्रण कक्ष, ग्राम सुरक्षा यंत्रणा गणेश लोकरे यांनी दिली.

Web Title : कासुरडी में ग्राम सुरक्षा प्रणाली से चोरी का प्रयास विफल; एकता की जीत।

Web Summary : कासुरडी में सतर्क ग्रामीणों ने 10 जनवरी को पूर्व सरपंच आखाड़े के घर में चोरी का प्रयास विफल कर दिया। ग्राम सुरक्षा प्रणाली को सक्रिय करने और निवासियों की त्वरित प्रतिक्रिया से चोर भाग गए। स्थानीय अधिकारियों द्वारा समन्वित प्रणाली प्रभावी साबित हुई।

Web Title : Village security system foils burglary attempt in Kasurdi; unity prevails.

Web Summary : Alert villagers in Kasurdi thwarted a burglary attempt at ex-Sarpanch Akhade's home on January 10th. Timely activation of the village security system and swift response from residents scared the thieves away. The system, coordinated by local officials, proved effective.