नीरा : पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा-मोरगाव मार्गावर, नीरा नजीक चौधरवाडी गावच्या हद्दीत रविवारी दुपारी बोलेरो जीपचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात वर्षीय मुलाचा (नातवाचा) जागीच मृत्यू झाला असून आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात मृत मुलाचे नाव स्वराज अजित मेमाणे (वय ७) असे असून, जखमी आजोबांचे नाव राधुनाथ बबन मेमाणे (वय ५०) आहे. हे दोघे दौंड तालुक्यातील खोपोडी येथील रहिवासी आहेत. दिवाळीनंतर आपल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी राधुनाथ मेमाणे गडदरवाडी येथे आले होते. परतीच्या प्रवासात बोलेरो जीप (क्र. MH-47-JE-6628) या बोलेरो जीपला समोरून आलेल्या टँकरला चुकवताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला जाऊन दगडाला धडकली.अपघात इतका भीषण होता की लहान स्वराजचा जागीच मृत्यू झाला, तर राधुनाथ मेमाणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नीरा पोलीस चौकीचे कर्मचारी संदीप मदने आणि प्रसाद कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या चारचाकी वाहनातून जखमींना नीरा येथील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.स्वराज आपल्या आत्याला आजोबांसोबत सोडायला आला होता. दिवाळी भाऊबीजसाठी आत्या खोपोडी येथे माहेरी गेली होती. तिला गडदरवाडी (ता. बारामती) येथे तिचे वडील व भाचा हे चारचाकीतून सोडायला आले होते. दुपारी काही काळ हा गोंडस मुलगा आत्याच्या घरासमोरील पटांगणात मुक्तपणे खेळत होता. त्याचे बोबडे बोल सर्वांना भावले होते. दीड-दोन तासांतच त्याने सर्वांची मने जिंकली होती, आणि काही क्षणातच तो अपघातात मृत पावल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Summary : A seven-year-old boy died and his grandfather was seriously injured in a Bolero jeep accident near Neera. The accident occurred when the driver lost control while avoiding a tanker. The deceased and injured were residents of Khopodi.
Web Summary : नीरा के पास एक बोलेरो जीप दुर्घटना में सात वर्षीय लड़के की मौत हो गई और उसके दादा गंभीर रूप से घायल हो गए। दुर्घटना एक टैंकर से बचने के दौरान चालक के नियंत्रण खो देने से हुई। मृतक और घायल खोपोडी के निवासी थे।