पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:42 IST2025-03-26T11:40:39+5:302025-03-26T11:42:34+5:30
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश
पुणे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा आज संध्याकाळी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे पार पडणार असून, या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहे. राज्यसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होणार आहे. या घडामोडींमुळे पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला असून स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या महिला पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश
1. आश्विनी मल्हारे
2. प्रतीक्षा महाले
3. भक्ती जगदाळे
4. सुप्रिया खेडकर
5. समीरा प्रधान
6. दिपाली पोटे
7. नूतन शरद दिवार
8. वैजयंती फाटे