आडतदारांच्या संपामुळे भिगवण धान्य मार्केट अचानक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:39 IST2025-10-26T13:37:48+5:302025-10-26T13:39:13+5:30
याबाबत मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अडतदरांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लिलावाचे कामकाज ठप्प आहे.

आडतदारांच्या संपामुळे भिगवण धान्य मार्केट अचानक बंद
भिगवण: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजारात आडतदारांना मिळत असलेल्या असुविधांमुळे आज रविवार (दि२६) रोजी आडतदार आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान्य आडतीवर खाली न करता आडती बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले आहे. याबाबत मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अडतदरांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लिलावाचे कामकाज ठप्प आहे.
भिगवण उपबाजारात व्यापारी अडतदारांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे आडतदारांनी सांगितले यामध्ये पाऊस आल्यास धान्य भिजून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे, पिण्यासाठी पाणी न मिळणे, शौचालयाचा अभाव वेळोवेळी मागणी करून देखील मागणी मान्य न होत नसल्याने आज रविवारचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत मार्केट कमिटीला व्यापारी अद्तदारानी कोणतीही पूर्व कल्पना न देताच हा निर्णय घेतला असल्याचे सभापती तुषार जाधव यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.