Video : मोरगाव येथे भाद्रपदी यात्रेला सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:17 IST2025-08-24T15:16:18+5:302025-08-24T15:17:15+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषांनी मोरगाव परिसर दुमदुमून गेला.

pune news bhadrapadi Yatra begins in Morgaon; Spontaneous response from devotees | Video : मोरगाव येथे भाद्रपदी यात्रेला सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Video : मोरगाव येथे भाद्रपदी यात्रेला सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती ( पुणे जि.) - अष्टविनायकातील पहिले स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरातील भाद्रपदी यात्रा उत्सवाला आज (२४ ऑगस्ट) पासून प्रारंभ झाला. या यात्रेनिमित्त पाच दिवस मुख्य गाभाऱ्यातील श्री मयुरेश्वराचे जलस्नान व पूजा करण्याची संधी भाविकांना उपलब्ध राहणार आहे.

पहिल्याच दिवशी या महोत्सवाला भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक लाखांहून अधिक भक्तांनी जलस्नानाचा लाभ घेतला. पहाटे चार वाजल्यापासून मंदिरासमोर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषांनी मोरगाव परिसर दुमदुमून गेला.



भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात भरत असलेल्या या यात्रेदरम्यान दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. पुढील तीन दिवस भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश व जलस्नानाची संधी मिळणार आहे. या संपूर्ण यात्रेसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मोरगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: pune news bhadrapadi Yatra begins in Morgaon; Spontaneous response from devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.