नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:26 IST2025-09-21T15:25:43+5:302025-09-21T15:26:06+5:30

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या

pune news are you observing a nine-day fast during Navratri Then take these precautions | नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

पुणे : नवरात्रीच्या पवित्र काळात लाखो भक्त उपवास करून देवीची आराधना करतात. हा उपवास केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने उपवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

उपवासात काय खावे? सात्त्विक आहाराचे नियम

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या :

सात्त्विक आहार : फळे, सुकामेवा (बदाम, मनुका), दूध, दही, मखाना आणि शिंगाड्याचे पीठ यांसारखे सात्त्विक पदार्थ खावेत. नवरात्रीत प्रामुख्याने लाल भोपळा, भेंडी या भाज्यांचा आहारात समावेश करतात. आहार सेवन करताना समान अंतराने आहार घ्यावा म्हणजे एकाच वेळी जास्त खाणे टाळावे. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दह्याचा समावेश करावा. ताजी फळे खावीत जेणेकरून शरीराला फायबर (तंतू) मिळून पचनास आणि पोट साफ होण्यास मदत होते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता.

हायड्रेशनची काळजी : शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा फळांचा नैसर्गिक रस प्यावा. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

आहाराचे वेळापत्रक : समान अंतराने जेवण घ्या. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दही घ्या. एकाच वेळी जास्त खाणे टाळा, जेणेकरून पचन बाधित होणार नाही.

चव आणि रोगप्रतिकारक : लिंबाचा रस वापरून जेवणाची चव वाढवा. हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करते. ताजी फळे खाऊन फायबर मिळवा, ज्यामुळे पोट साफ राहते. 

उपवासाचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे जठराग्नी जागृत होतो, जो शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. यामुळे :

शरीरातील आळस आणि जडपणा निघून जातो.

सर्व पेशींचे पुन:नवीकरण होते, ज्यामुळे शरीर शुद्ध आणि ऊर्जावान बनते.

मन आणि शरीर यांचा संबंध दृढ होतो, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

दीर्घकाळ उपवास केल्याने पचनसंस्था विश्रांती घेते, ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते.

नवरात्रीच्या उपवासात शरीराची काळजी घेण्यासाठी हलके आणि पौष्टिक सात्त्विक आहार घ्या, जसे की फळे, सुकामेवा, दूध आणि दही. तेल, मीठाचा अतिवापर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. जसे तळलेले पदार्थ टाळावे, त्याजागी वाफवलेले किंवा शिजवलेले पदार्थ घ्या. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उपवास करताना शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतील, याची खात्री करा.  - कस्तुरी भोसले (आहारातज्ज्ञ) 

Web Title: pune news are you observing a nine-day fast during Navratri Then take these precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.