शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल

By दीपक होमकर | Updated: May 31, 2025 08:07 IST

पुण्यातील केंद्रीय विद्यालय २१ जूनला होणार सुरु; खासगी शिक्षण संस्थाच्या सर्व शाळा २ ते १६ जूनपर्यंत वेगवेगळ्या दिवशी होणार सुरू

पुणे : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांवर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचा अंकुश नाहीच, मात्र सीबीएससीकडूनही इतका मनमानी कारभार सुरू झाला आहे की, शाळेच्या शुल्कासह शाळा सुरू करण्याच्या (स्कूल रीओपन) तारखाही शाळेच्या सोयीप्रमाणे जाहीर केल्या आहेत. वास्तविक पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय २१ जूनपासून सुरू होत असताना पुण्यातील खासगी शिक्षण संस्थेच्या सीबीएसई शाळांनी मात्र १ जून, ५ जून, ८ जून, १० जून, ११जून अशा वेगेवेगळ्या तारखा ठरवून त्याप्रमाणे पालकांना शाळेच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज केला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी अर्थात एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या राज्यातील विदर्भ वगळता सर्व शाळा १६ जून रोजी सुरू होणार आहेत. तसे परिपत्रक शिक्षण मंडळाकडून शाळांना पाठविले आहेत. शाळांना ते नियम बंधनकारक असून १६ जूनच्या आधी किंवा किंवा नंतरच्या तारखांना शाळा सुरू करता येणार नाही तसे केल्यास त्या शाळांवर कारवाई केली जाते. असा नियम सीबीएसई शाळांनाही अपेक्षित असताना शाळांकडून मात्र शाळेच्या आणि संस्थेच्या सोयीप्रमाणे शाळा सुरू केली जाते.

सीबीएसई शाळेकडून वर्षभरातील सुट्यांचे परिपत्रक जाहीर केले जाते त्यामध्ये व्दितीय सत्राची परीक्षा कधी घ्यावी, कधी संपवावी आणि नवे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे त्यानंतर कधी सुट्या द्याव्यात याचे वेळापत्रक दिलेले असते मात्र पुण्यातील बहुतांश शाळा त्या वेळापत्रकाचे पालन करत नाही.  उन्हाळ्याची सुटी ५० दिवसकेंद्रीय विद्यालयाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्षे १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सुरू झाले होते, त्यानंतर १ मे पासून उन्हाळ्याची सुटी (समर व्हेकेशन) सुरू झाली. सीबीएससी संलग्न बहुतांश शाळांनी सुध्दा उन्हाळी सुटी १ मे पासून सुरू केली. केंद्रीय विद्यालयाने सुमारे ५० दिवस सुटी देत २१ जून रोजी सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

शाळा सुरू होण्याच्या शाळांच्या तन्हा२ जून: आरएमडी सिंहगड स्कूल, वारजे, युरेका इंटरनॅशनल स्कूल, जेएसपीएम हडपसर, सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव, जीजीआयएस बावधन, सेंट झेविअर्स, होली मिशन, सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, टिकेकरनगर, वॉलनट स्कूल, शिवणे३ जून: ऑर्चिड स्कूल, आंबेगाव. ५ जून: पोदार स्कूल, आंबेगाव, सिटी इंटरनॅशनल स्कूल, सातारा रोड.उपसंचालक, शिक्षण विभाग पुणे.९ जून : दिल्ली पब्लिक स्कूल, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, पोलिस पब्लिक स्कूल, होली एंजल्स, द ऑर्बिस स्कूल, कलमाडी स्कलू, कर्वेनगर, संस्कृती स्कूल, उंड्री, न्यू पुणे पब्लिक स्कूल११ जून: आर्यन स्कूल, भिलारवाडी, विद्याशिल्प पब्लिक स्कूल, आर्यन वर्ल्ड स्कूल, कात्रज.१२ जून : माउंट कार्मेल स्कूल, सांगवी१६ जून: नासेंट किग्जवे स्कूल,२१ जून : पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय  

सीबीएसटीचे पॅटर्न बदलण्याची मागणीएसएससी अभ्यासक्रमाच्या शाळांची वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर होतात आणि सुट्या संपल्यावर १६ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. हाच पॅटर्न सीबीएसईनेसुद्धा राबवावा आणि उन्हाळी सुटी संपल्यावरच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.जिल्ह्यात १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूजिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी ३१ मे रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 आम्ही फक्त एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांनाच सुट्या व परीक्षांच्याबाबत सूचना देतो, सीबीएससीच्या शाळांना केंद्रीय बोर्डाकडून त्यांच्या सूचनांचे परिपत्रक येते. त्यामुळे त्यांना आम्ही सूचना देत नाही. - सुनंदा वाखारे,उपसंचालक, शिक्षण विभाग पुणे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र