Pune News: वाळकी येथे मुळा-मुठा नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:24 IST2022-09-13T14:24:31+5:302022-09-13T14:24:55+5:30
पावसामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ...

Pune News: वाळकी येथे मुळा-मुठा नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह
पाटेठाण (पुणे): वाळकी (ता. दौड) येथील मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी (दि.१३) रोजी सकाळच्या सुमारास आढळून आला आहे. संबधित व्यक्ती अंदाजे पंचेचाळीस वर्षे वयाची असुन अंगामध्ये पिवळा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झाली होती. संबधित मृतदेह अर्ध कुजलेल्या अवस्थेत आहे. वाळकीचे पोलीस पाटील निलकंठ थोरात यांनी घटनेची माहिती यवत पोलिसांना दिली आहे. याबाबत कोणाला अधिकची माहिती असल्यास यवत पोलिंसाशी संपर्क साधण्याचे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.