शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

Video : १ मेपासून कारवाईच..! मराठी अनिवार्य; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा  

By किरण शिंदे | Updated: April 30, 2026 13:23 IST

- एक मेपासून या नियमांची अंमलबजावणी करून कारवाई सुरू होणारच आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पुणे -महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पिंपरी-चिंचवड शहरात माध्यमांशी बोलताना याबाबत स्पष्ट इशारा दिला.महाराष्ट्रातमराठी सक्तीचा नियम नवीन नसून १९८९ पासूनच तो अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. या नियमात नुकत्याच काही सुधारणा करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “एक मेपासून या नियमांची अंमलबजावणी करून कारवाई सुरू होणारच आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी येणं अनिवार्य आहे. मग तो रिक्षाचालक असो, टॅक्सी चालक असो किंवा ॲप-आधारित सेवा देणारे ओला-उबेर चालक असोत.” प्रवाशांशी संवाद साधताना भाषा न समजल्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात आणि त्यातून पोलिसांत तक्रारी दाखल होतात, असेही त्यांनी नमूद केले.

“प्रवासी मराठीत बोलत असताना चालकाला भाषा समजत नसेल, तर वादावादी होऊन प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे ही सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून मराठी शिकवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, याबाबत कुणीही संभ्रमात राहू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “महाराष्ट्रात राहायचं असेल आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा येणं आवश्यकच असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Mandatory for Businesses in Maharashtra From May 1st: Warning!

Web Summary : Maharashtra businesses must adopt Marathi from May 1st. Minister Sarnaik warns of strict enforcement for all, including app-based services, to avoid disputes arising from language barriers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रpratap sarnaikप्रताप सरनाईकmarathiमराठीPuneपुणे