शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पती अन् सासूच्या जाचाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:24 IST

Pune Crime News: विषारी कीटकनाशक घेतल्यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

यवत : पडवी (ता. दौंड) येथील विवाहितेने पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना १७ मार्च २०२५ रोजी घडली. विषारी कीटकनाशक घेतल्यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

सारिका प्रशांत शितोळे (वय ३५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिला एक लहान मुलगादेखील आहे. याबाबत मुलीचे वडील जयसिंग फक्कडराव पवार (६६, रा केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती प्रशांत मानसिंग शितोळे व सासू सुनीता मानसिंग शितोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पती प्रशांत शितोळे याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती आणि सासूने डिलिव्हरीसाठी गेलेले २५ हजार रुपयांची वेळोवेळी मागणी करीत होते. तसेच मृत सारिका हिचा मुलगा विहान याचे दुभंगलेले ओठ या कारणावरून सारिका हिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. तसेच नवरा प्रशांत याची बाहेर सुरू असलेले अनैतिक संबंध यातून मारहाण करून तिला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले होते.

गुढीपाडव्याला जाणार होते नवीन घरात; सासूच्या जाचाला कंटाळून सुनेने उचललं टोकाचं पाऊल.

उपचारांदरम्यान सारिका हिचा मृत्यू झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर पडवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, विवाहितेच्या नातेवाइकांनी याबाबत पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. विवाहिता नक्की स्वतः विषारी कीटकनाशक प्यायली की तिला बळजबरीने पाजले गेले ? याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्याDomestic Violenceघरगुती हिंसा