शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पांतील धरणांत नव्याने ५.६ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:44 IST

- सद्यस्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ६,७०३ दलघ फूट (६.७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी २२.५९ टक्के झाली आहे

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १० मे २०२५ पासून झालेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण तसेच प्रकल्पांतर्गत असलेल्या विसापूर, घोड या आठ धरणात ५.६ टीएमसी पाणीसाठा नव्याने आला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 सद्यस्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ६,७०३ दलघ फूट (६.७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी २२.५९ टक्के झाली आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.०१ चे कार्यकरी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.

या वर्षी मे मध्येच पावसाला सुरवात झाल्याने वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी डिंभा या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सलग आणि मुसळधार पाऊस असताना म्हणावा असा धरणात पाणीसाठा झालेला नाही. विसापूर आणि घोड धरणात पाणीसाठा समाधानकारक वाढला आहे. विसापूर धरण ८९.६५ टक्के तर घोड धरण ७६.९५ टक्के भरलेले आहे.

धरणातील पाणीसाठा आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे : येडगाव १,०३८ दशघ फूट (५३.४० टक्के), माणिकडोह १२८८ दशघ फूट (१२.६६ टक्के), पिंपळगाव जोगा वजा - १७७ दशघ फूट (४.५६ टक्के), वडज ५८८ दशघ फूट (५०.१४ टक्के), चिल्हेवाडी ५९७ दशघ फूट (७४.४४ टक्के), डिंभा ३,७८८ दशघ फूट (३०.३२ टक्के), विसापूर ८१० दशघ फूट (८९.६५ टक्के), घोड ३७५० दशघ फूट (७६.९५ टक्के).

कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांमध्ये एकूण ६,७०३ दशघ फूट (२२.५९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजमितीला या सर्व धरणांमध्ये १०८१ दशघ फूट (३.६५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजमितीला १८.९४ टक्के पाणीसाठा जादा आहे.

धरणातील पाणलोट क्षेत्रात या मान्सूनमध्ये झालेला पाऊस पुढीलप्रमाणे :

वडज : १७७ मिमी.

येडगाव : १३५ मिमी.

माणिकडोह : २२६ मिमी.

पिंपळगाव जोगा : १९५ मिमी.

चिल्हेवाडी : १८५ मिमी.

डिंभा : ३३१ मिमी.

विसापूर : २७ मिमी.

घोड : ६४ मिमी.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीRainपाऊस