शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांना पाठविले सक्तीच्या रजेवर; राज्य सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:33 IST

यात उपजिल्हाधिकारी तहसीलदार महसूल सहायक, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक यांचा समावेश आहे. 

पुणे : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम १५५ च्या तरतुदींचा गैरवापर केल्याप्रकरणी राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या अहवालात १३ प्रकरणांत गंभीर अनियमितता आढळली आहे. याबाबत राज्य सरकारने आता कारवाईचा बडगा उचलला असून, पहिल्या टप्प्यात १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर पुण्यावरून बदली करून सध्या मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर येथे कार्यरत असलेल्या चार अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. यात उपजिल्हाधिकारी तहसीलदार महसूल सहायक, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक यांचा समावेश आहे. 

सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने जमीन महसूल अधिनियमातील कलम १५५ नुसार तहसीलदारांना अधिकार दिले होते. या अधिकाराचा वापर करून चुका दुरुस्त करण्याऐवजी काही तहसीलदारांनी गैरवापर करून जमिनीचा वर्ग, क्षेत्र आणि भोगवटदार यामध्ये बेकायदेशीर बदल केल्याच्या गंभीर तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील या प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नाशिक येथील विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने एकूण ३८ हजार २७ प्रकरणांची प्राथमिक तपासणी केली. त्यात कागदपत्रे उपलब्ध झालेल्या २ हजार ३३७ प्रकरणांपैकी १३ प्रकरणे 'अ' वर्गवारीत (अतिगंभीर स्वरूपाची) असल्याचे निष्पन्न झाले होते. 

या प्रकरणांमध्ये कायद्याचा जाणीवपूर्वक गैरवापर करून मालकी हक्कांत बेकायदेशीर फेरबदल केल्याचे समितीने निष्कर्ष नोंदविले आहे. म्हणून अतिगंभीर १३ प्रकरणांमध्ये जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार पंधरा अधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश महसूल विभागाचे कक्ष अधिकारी श्रद्धा मगर यांनी काढले.

अधिकाऱ्याचे नाव-- पूर्वीचे कार्यरत पद-- सध्या कार्यरत

गीता गायकवाड, अतिरिक्त तहसीलदार, पिंपरी चिंचवड--उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर

ज्योती देवरे, तहसीलदार, खेड--अतिरिक्त तहसीलदार, मालेगाव जि. नाशिक

रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर--प्राचार्य रामेती, पुणे

व्यंकटेश भोसले, मंडळ अधिकारी, जुन्नर--मंडळ अधिकारी, आंबेगाव

प्रल्हाद पाटील, महसूल सहायक, जुन्नर, महसूल सहाय्यक, आंबेगाव

श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापूर--विशेष भूसंपादन अधिकारी, धाराशिव

मधुसुधन बर्गे, तहसीलदार, मावळ-- उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) नागपूर

मारुती चोरमले, मंडळ अधिकारी, शिवणे (मावळ)--सध्या निलंबित

अश्विनी गोरे, ग्राम महसूल अधिकारी, शिवली (मावळ)--ग्राम महसूल अधिकारी, शिवली (मावळ)

सुजाता रच्चेवार, ग्राम महसूल अधिकारी, कुरवंडे (मावळ)--ग्राम महसूल अधिकारी, वराडे (मावळ)

श्रीकांत कुलकर्णी, लिपीक, मावळ--महसूल सहाय्यक, पुणे शहर

सुरेश जगताप, मंडळ अधिकारी, खडकाळा (मावळ)--सहायक महसूल अधिकारी, खनिकर्म अधिकारी कार्यालय, पुणे

ज्ञानेश्वर भराटे, ग्राम महसूल अधिकारी, तळेगाव ढमढेरे--ग्राम महसूल अधिकारी, पाषाण

संजय पाटील, तहसीलदार, दौंड--उपजिल्हाधिकारी, करमणूक कर, मुंबई शहर

English
हिंदी सारांश
Web Title : 15 Officials Sent on Forced Leave for Abuse of Power

Web Summary : Maharashtra government acted against 15 officials, including 11 from Pune, sending them on forced leave for misusing land revenue provisions. An inquiry found serious irregularities in land records, leading to the action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र