पुणे : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या दहा दिवसांत सुमारे १२ हजार वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर दुचाकी आणि चारचाकी खरेदीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पुण्यात दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे ‘चारचाकींचे शहर’ अशीही नवी ओळख निर्माण होत आहे.
गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दिवाळी या महत्वाच्या सणांसह वर्षभर शहरात वाहने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातात. पुण्यात दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे चारचाकीचे शहर अशी नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्यावर्षी पाडव्याला सर्वच वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. २०२५ मध्ये गुढीपाडव्याला १३ हजार १९० वाहनांची खरेदी झाली होती. तर यंदा २०२६ मध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये सात हजार ९८६ दुचाकी आणि दोन हजार ६६० कारची खरेदी झाल्याचे दिसून आले आहे.
ई-वाहन खरेदीत किंचित घट :
पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ई-वाहन खरेदीत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर २१२४ ई-वाहनांची खरेदी झाली होती. यंदा ती १५३० वर आली आहे. ई-बाईक खरेदीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. तर कार खरेदी देखील ९० ने घट नोंदवली आहे. ई-वाहनांच्या वाढल्या तक्रारींमुळे नागरिकांकडून ई-वाहन खरेदीऐवजी इतर वाहनांना पसंती दिली जात आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेली वाहन खरेदी
वर्षे---दुचाकी-- कार-----गुड्स----रिक्षा--- बस ------ टॅक्सी ----- अन्य वाहने --- एकूण
२०२५----८२६० ------३३३२---- ५९०----- २८३ ------९४---२८०-----१८७------१३१९०
२०२६---७९८६-------२६६०------४५७-----२६७-----४४----२८७-----१६७------११९३७
Web Summary : Pune witnessed a surge in vehicle purchases this Gudi Padwa, with nearly 12,000 registrations. While two and four-wheeler sales boomed, electric vehicle purchases saw a slight dip due to rising consumer complaints. Pune is increasingly becoming known as a 'city of cars'.
Web Summary : पुणे में गुड़ी पड़वा पर वाहनों की खरीद में उछाल आया, लगभग 12,000 पंजीकरण हुए। दोपहिया और चौपहिया वाहनों की बिक्री बढ़ी, लेकिन उपभोक्ता शिकायतों के कारण इलेक्ट्रिक वाहनों की खरीद में थोड़ी गिरावट आई। पुणे तेजी से 'कारों का शहर' के रूप में जाना जा रहा है।