शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुणे महापालिकेच्या पाणी कराराची मुदत संपणार ऑगस्ट अखेरीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 11:29 IST

पुन्हा एकदा पुण्याचा पाणी प्रश्न चर्चेला येणार आहे..

ठळक मुद्देनवा प्रस्ताव नाही : सध्याच्या पाणी वापरात कपातीची टांगती तलवार

पुणे : महानगरपालिकेच्या पाणी कराराची मुदत येत्या ३१ऑगस्ट रोजी संपत असल्याने, पुन्हा एकदा पुण्याचा पाणी प्रश्न चर्चेला येणार आहे. अजूनही नव्या काराराबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाशी संपर्क साधला नसल्याची माहिती जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे महानगरपालिका कराराप्रमाणे साडेअकरा अब्ज घनफूट पाणी घेणार की, पुन्हा मुदतवाढ घेऊन सध्याप्रमाणेच वार्षिक १७ टीएमसी प्रमाणे पाणी उचलणार याकडे लक्ष लागले आहे. महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला आहे. सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराला कमी पाणी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. खडकवासला साखळीतील टेमघर धरणात दुरुस्तीच्या कामामुळे पावणेचार टीएमसीच्या तुलनेत निम्मा पाणीसाठा करण्यात आला होता. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने धरणात पुरेशा क्षमतेने पाणी नव्हते. उन्हाळ््यामधे शेती आणि पुण्याच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याची कपात होते की काय असेही चित्र निर्माण झाले. जलसंपदाने पाणी पुरवठा देखील थांबविला होता. महापौरांनी विनंती केल्यानंतर पुन्हा पाणी सुरु करण्यात आले. तसेच, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कराराला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. त्याची मुदत या महिना अखेरीस संपत आहे.  प्रतीदिन १३३४ एमएलडी पाण्याची मागणी  पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात असून शहराचा सुधारित करार करून प्रतिदिन १३३४.५० एमएलडीप्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणी पालिकेने या पुर्वी केली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा लोकसंख्येचा पुरावा सांक्षांकीत करुन दिलेला नाही. सध्या शहरासाठी दररोज १३०० ते १४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलण्यात येत आहे. वार्षिक १७ ते साडेसतरा टीएमसी इतके हे पाणी होते. --------------------

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater shortageपाणीकपातPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका