पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पुण्यात भाजप तब्बल ४७ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी केवळ १२ जागांवर आघाडीवर आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने मुसंडी मारत ३८ जागांवर आघाडी घेतली आहे.अजित पवारांनी प्रचारादरम्यान पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा प्रमुख मुद्दा मांडला होता. पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असून, दरमहा सुमारे ७.५ कोटी रुपयांचे इंधन वाया जाते, तर वार्षिक नुकसान १०,८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते, असा दावा त्यांनी केला होता.पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटया समस्येवर उपाय म्हणून पीएमपीएमएल बससेवा आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने जाहीर केला होता. यासाठी पुणे महापालिकेला दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, वाहनसंख्या कमी झाल्याने प्रदूषणात मोठी घट होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. मात्र, मतदारांनी हा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थितीपिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागा असून त्यापैकी २ जागा बिनविरोध भाजपकडे गेल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वाधिक ५० जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) २६ जागांवर, शिंदे गटाची शिवसेना ७ जागांवर, तर इतर पक्ष आणि अपक्ष मिळून २ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि मनसे यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.या निकालांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, अजित पवारांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Web Summary : Ajit Pawar faced a setback as his free metro proposal failed to resonate with voters. The BJP leads significantly in Pune and Pimpri-Chinchwad municipal elections, raising questions about Pawar's leadership and solidifying BJP's dominance in the region.
Web Summary : अजित पवार को झटका लगा क्योंकि उनका मुफ्त मेट्रो प्रस्ताव मतदाताओं को पसंद नहीं आया। पुणे और पिंपरी-चिंचवड नगर निगम चुनावों में भाजपा महत्वपूर्ण रूप से आगे है, जिससे पवार के नेतृत्व पर सवाल उठ रहे हैं और क्षेत्र में भाजपा का प्रभुत्व मजबूत हो रहा है।