शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

पुणे महापालिकेची आता खरी कसोटी लागणार; २३ गावांच्या समावेशानंतर 'हे' मोठे आव्हान राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 1:09 PM

जिल्हा परिषदेकडून या २३ गावांमधील वास्तूंचा व मिळकतींचा ताबा घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान राहणार

पुणे : कररूपी पैशातून आम्ही शाळा, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्रांची उभारणी केली असल्याने, प्रथम त्याचे पैसे अदा करा व नंतर ताबा घ्या. अशी गळ घालणाऱ्या जिल्हा परिषदेकडून या २३ गावांमधील वास्तूंचा व मिळकतींचा ताबा घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान राहणार आहे. 

पुणे महापालिका हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य जिल्हा परिषदेच्या इमारतीच अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. या ११ गावांमध्ये अशा ३६७ वास्तू असून, यापैकी २५६ वास्तू आजपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित १०१ वास्तू (मालमत्ता) ताब्यात घेण्यासाठी सध्या कसरत चालू आहे. या ११ गावांपैकी एका ठिकाणी ५० वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेचा ताबा देण्यासाठी महापालिकेकडे ६५ लाख रूपये जिल्हा परिषदेने मागितले आहेत. मुळात ही शाळा मोडकळीस आली असताना अशी अवास्तव मागणी होत आहे.  

दरम्यान, महापालिकेच्या ताब्यात न आलेल्या मालमत्ता व वास्तूंचे आता जिल्हा परिषद व महापालिका यांच्याव्दारे संयुक्त मुल्यांकन करून ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. फेब्रुवारी,२०२० मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र कोरोना आपत्तीमुळे हे काम थांबले होते़ २३ गावांच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.     ----------------------पुणे महापालिकेच्या ताब्यात जोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या वास्तू येत नाहीत तोपर्यंत तेथे महापालिकेची यंत्रणा उभारता येत नाही. यामध्ये सर्वाधिक वास्तू या शाळांच्या आहेत़ तर त्यापाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पाण्याच्या टाक्या, समाजमंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय आदींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त असलेल्या मोकळ्या जागा, मैदाने, तळी, स्मशानभूमी आदी मालमत्ता गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर लागलीच हस्तांतरित होतात. यामुळे आता पहिल्या ११ गावांमधील व नव्याने येणाऱ्या २३ गावांमधील मालमत्ता ताब्यात घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. ---------------शाळा, आरोग्य केंद्राच्या इमारती घेणे आव्हान.. पुणे महापालिकेच्या ताब्यात जोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या वास्तू येत नाहीत तोपर्यंत तेथे महापालिकेची यंत्रणा उभारता येत नाही़. यामध्ये सर्वाधिक वास्तू या शाळांच्या आहेत. तर त्यापाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पाण्याच्या टाक्या, समाजमंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय आदींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त असलेल्या मोकळ्या जागा, मैदाने, तळी, स्मशानभूमी आदी मालमत्ता गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर लागलीच हस्तांतरित होतात. यामुळे आता पहिल्या ११ गावांमधील व नव्याने येणाऱ्या २३ गावांमधील मालमत्ता ताब्यात घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. ---------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाzpजिल्हा परिषदcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारी