धायरी : पुणे महानगरपालिकेच्या वतीने वडगाव बुद्रूक येथील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. वडगाव बुद्रूक येथील सर्व्हे नंबर ४३ मधील जलशुद्धीकरण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील तब्बल ५०,२४३ चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.
ही मोहीम महापालिकेच्या विविध विभागांच्या समन्वयाने यशस्वी करण्यात आली. यामध्ये अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, बांधकाम विभाग आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अतिक्रमण उपायुक्त रमेश शेलार आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते. वारंवार सूचना देऊनही बांधकामे न हटवल्याने प्रशासनाने ही कठोर पाऊले उचलली. आता सर्व अतिक्रमणे हटवण्यात आल्यामुळे, संबंधित ठेकेदाराला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करता येणार आहे. यामुळे परिसरातील पाणीपुरवठा सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महत्त्वाच्या नागरी सुविधांच्या आरक्षित जागांवर अशीच कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
Web Summary : Pune Municipal Corporation cleared 50,243 sq ft of encroachments on land reserved for a water purification plant in Wadgaon Budruk. This action, involving multiple departments, removes obstacles to the plant's second phase, ensuring smoother water supply. Further actions on reserved lands are planned.
Web Summary : पुणे महानगरपालिका ने वडगांव बुद्रुक में जल शोधन संयंत्र के लिए आरक्षित भूमि पर 50,243 वर्ग फुट अतिक्रमण हटाया। कई विभागों की भागीदारी से, यह कार्रवाई संयंत्र के दूसरे चरण के लिए बाधाओं को दूर करती है, जिससे सुचारू जल आपूर्ति सुनिश्चित होती है। आरक्षित भूमि पर आगे भी कार्रवाई की योजना है।