पुण्यात शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह झाल्याने महापालिकेची शाळा करावी लागली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 11:09 AM2021-02-12T11:09:59+5:302021-02-12T11:22:09+5:30

Coronavirus News : कोंढव्यातल्या महापालिकेच्या संत गाडगेबाबा शाळेतील एक शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने शाळा बंद करण्यात आली आहे.

Pune municipal corporation school closed as teacher turns Covid positive | पुण्यात शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह झाल्याने महापालिकेची शाळा करावी लागली बंद

पुण्यात शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह झाल्याने महापालिकेची शाळा करावी लागली बंद

Next

पुणे - कोंढव्यातल्या महापालिकेच्या संत गाडगेबाबा शाळेतील एक शिक्षक कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने शाळा बंद करण्यात आली आहे. या शाळेतल्या शिक्षकांनागी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. 

पुणे महापालिकेने गेल्या महिन्यातच शाळा सुरु केल्या होत्या. आधी नववी दहावी आणि नंतर माध्यमिकचे वर्ग सुरु करण्यात आले होते. शाळा सुरु होण्यापूर्वी संपुर्ण शाळेची स्वच्छता आणि शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. पुण्यातली कोरोना पेशंटची संख्या लक्षात घेता राज्यापेक्षा उशीराने शहरातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. 

मात्र कोंढव्यातील या शाळेत एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह असलेयाचे निदर्शनास आले आहे. यानंतर शाळा तातडीने बंद करण्यात आली आहे. या शाळेतील इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच शाळेत येणाऱ्या १५० विद्यार्थ्यानाही निगराणीखाली ठेवण्यात आले असुन त्यांच्यापैकी कोणाला लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अॅडिशनल कमिशनर सुरेश जगताप यांनी दिली

Web Title: Pune municipal corporation school closed as teacher turns Covid positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.