शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांच्या मदतीला पुणे महापालिका सरसावली : १७ टँकरसह २७ जणांचे पथक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

पुणे : कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मदतीला पुणे महापालिका सरसावली असून, महापालिकेने १७ पिण्याच्या टँकरसह २७ ...

पुणे : कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मदतीला पुणे महापालिका सरसावली असून, महापालिकेने १७ पिण्याच्या टँकरसह २७ जणांचे पथक कोल्हापूरला रवाना केले आहे.

मुसळधार पावसामुळे कोकणबरोबरच, सांगली, कोल्हापूर सर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या विनंती नुसार, पुणे महापालिकेकडून पाणी पुरवठयासाठी १७ पाण्याचे टॅंकर तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह, इतर महत्वाच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी २७ जणांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.

कोल्हापूरच्या काही भागातील जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले असून, पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे जलकेंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेस मदत करण्याबरोबरच, इतर कामांसाठी २१ सुपरवायझर तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी कोल्हापूरला पुढील आठवडाभर राहणार आहेत. आज हे पथक कोल्हापूरला पोहचले असून, त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय कोल्हापूर महापालिकेकडून करण्यात आली आहे.

या आपत्ती काळात पुणे महापालिकेकडून मदतीची परंपरा कायम ठेवली असून, आवश्‍यकतेनुसार व मागणीनुसार आणखी मदत पुणे महापालिकेकडून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.