शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे १५ हजार ६६९ कोटींचे बजेट, पुणेकरांवर योजनांची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:29 IST

- स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण सभेला सादर केला अर्थसंकल्प; महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के करमाफी

पुणे :पुणेकरांवर कोणतीही करवाढ न करणारे महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेला सादर केला. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र महसूल समिती स्थापन केली जाणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के करमाफी, महिलाना शंभर मोफत स्वच्छतागृहे, सारसबागेत काचेचा पुल, बाणेरला कॅन्सर हॉस्पिटल, ११ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, महिलासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र, कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा विकास, ‘नमो गार्डन’, मिरॅकल गार्डन, देशातील पहिली वायू नियंत्रण यंत्रणा, एआय तक्रार निवारण प्रणाली आणि स्मार्ट शिक्षण-प्रशिक्षणावर भर यांसह तब्बल १३८ योजनांची अक्षरश: खैरात करण्यात आली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे बजेट सर्वसाधारण सभेला आज सादर केले. आयुक्त नवल किशोर राम यांनी १३ हजार ९९५ कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात तब्बल १ हजार ६७४ कोटींनी वाढ करून १५ हजार ६६९ कोटींचे बजेट सादर केले आहे. पालिकेला वस्तू व सेवा करातून (जीएसटी) २ हजार ९१७, मिळकत करातून ३ हजार ८८२ कोटी, पाणीपट्टी ४७० कोटी, पाणीपट्टी मीटर २७१ कोटी, बांधकाम परवानगी ३०६९ कोटी, शासकीय अनुदान १४३४ कोटी, कर्ज ५०० कोटी, पंतप्रधान आवास योजनांमधून ९३ कोटी, इतर जमामधून १५४७ कोटी रुपये या बाबींवर बजेटचा डोलारा उभा करण्यात आला आहे. भांडवली व विकासाच्या कामांसाठी ७ हजार ६८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. महापालिकेला सर्वांत जास्त २५टक्के उत्पन्न मिळकत करातून वस्तू व सेवा करातून (जीएसटी) २४ टक्के, शहर विकास चार्जेसमधून २३ टक्के उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. यावर्षी ४८ टक्के खर्च विकासकामे आणि प्रकल्पांवर होणार आहे; तर २५ टक्के खर्च सेवकवर्गावर होणार आहे.

महसूल समितीची स्थापना

गेल्या काही वर्षांतील अंदाजपत्रकांचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षातील उत्पन्न यात मोठी तफावत दिसून येते. त्यासाठी अंदाजपत्रकातील अपेक्षित उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना आणि अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे पालिकेची स्वतंत्र महसूल समिती स्थापन करून उत्पन्नवाढीच्या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे. या समितीमार्फत कर संकलन आणि थकबाकी वसुलीवर भर दिला जाईल. यामुळे महसूल व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊन पालिकेच्या आर्थिक सक्षमतेस चालना मिळणार आहे. पालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी विशेष कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. केंद्र आणि राज्य सरकारकडे विविध अनुदानांपोटी थकबाकी आहे; तसेच केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या शहरात असलेल्या शासकीय कार्यालयांकडे करापोटी मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली जाईल.

असे वाढले १ हजार ६७४ कोटी

महापालिका आयुक्तांच्या बजेटपेक्षा १ हजार ६७४ कोटीनी वाढ करून १५ हजार ६६९ कोटींचे बजेट स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केले आहे. आयुक्तांच्या बजेटपेक्षा मिळकत करात ५२० कोटी, बांधकाम परवानगीत ३०० कोटी, शासकीय अनुदानात ५०० कोटी आणि इतर जमामध्ये ३४४ कोटींनी वाढ केली आहे. त्यामुळे मिळकत कर, बांधकाम परवानगी, शासकीय अनुदान, इतर जमा यामध्ये एकूण १ हजार ६७४ कोटी वाढविले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Budget: No New Taxes, Many New Projects

Web Summary : Pune's budget avoids tax hikes, focusing on revenue growth and citizen benefits. New initiatives include women's programs, healthcare upgrades, infrastructure projects, and smart city solutions, totaling ₹15,669 crores, exceeding the commissioner's proposal.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMunicipal Corporationनगर पालिका